पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्वमीमांसा. हे शिकणे विधिप्रयुक्त आहे किंवा नाही, ही त्यावर शंका. विचारशास्त्राचा अभ्यास वैध आहे, म्हणजे तो विध्युक्त आहे, असे म्हणणारांस त्यांच्या प्रतिपक्षाचे लोक हा प्रश्न करतील. काय हो ! आचार्याने में मुलाचें अध्यापन करावयाचें तें त्या मुलाला वेदाचा अर्थ समजावून देऊन, त्याकडून अध्ययन करून घ्यावयाचें ? किंवा (२) त्या मुलाकडून फक्त वेद पाठ करून घ्यावयाचा ? ह्या दोन गोष्टींपैकी पहिली गोष्ट तर खास नाही. कारण मुलास वेदाचा अर्थ न शिकवितां आचार्यांकडून अध्यापन केले जाते. वेद पाठ करून घ्यावा, येवढाच जर अध्यापनाचा अर्थ असेल तर मग ह्या विषयाचा विचार सुद्धां करग्वयास नको. कारण जेथें वेदाचा अर्थ मुळीच समजत नाही, तेथे त्या अर्थासंबन्धान शंका येणार तरी कशी! शंका असल्यावर तिच्या निर्णयासाठी विचारशास्त्राची मदत लागते. वेदाचें केवल पाठान्तर करण्यांत अर्थबोध होत नाही. अर्थबोध न झाल्यामुळे त्याबद्दल शंका कवींच यावयाची नाही. शंका येत नाही म्हणून तिचा निर्णय करण्याचा प्रसंगहि येणार नाही. निर्णय करण्याची वेळच कधीहि येणार नसली, तर विचारशास्त्र शिकण्याची काय जरूरी आहे ? म्हणून दोन्ही पक्षी विचार केला असतां, असें दिसून येतें की विचारशास्त्र हैं वैध नाही, म्हणजे याचें अध्ययन करावे असें आम्हांस विधि सांगत नाही. हा पूर्वपक्षाचा वाद झाला. यावर सिद्धान्ती म्हणतात:---आचानि अध्यापन करावें.