पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. या नियोगाचा नियोज्य कोण ? असा प्रश्न उत्पन्न होतो. नियोगाला नियोज्य पाहिजे. वरच्या स्मृतिवाक्यांत क्रियापदांची आत्मनेपदि रूपे आहेत. ( उपनयीत, अध्यापयीत) या रूपांवरून पाणिनीच्या सूत्राप्रमाणे (१-३-३६) आचार्यच येथे नियोज्य आहे, म्हणजे आचार्याने उपनयन व अध्यापन ही दोन्ही कृत्ये त्याने करावीत. .. मुलाच्या अध्ययनावांचून आचार्याकडून होणारे अध्यापन सिद्धीस जाणार नाही. मुलगा शिकतच नाही, तर गुरुजी शिकविणार कसें! प्रयोजकाचे व्यापाराला प्रयोज्याचा व्यापार अवश्य झाला पाहिजे. वर सांगितलेल्या नियोगांत आचार्याने शिकवावे, असे सांगितले आहे, मुलाने शिकावे असा निराळा विधि सांगितला नाही. तेव्हां मुलगा शिकणारच नाही, असे म्हणणे चालणार नाही,-या शंकेत अर्थ नाही. कारण जरी अध्ययनाविषयीं निराळा विधिप्रयोग सांगितला नाही, तरी आचार्याने अध्यापन करावे ह्या विधिप्रयुक्तीने अध्ययनाचे अनुष्ठान झाले पाहिजे, असा अर्थ सिद्ध होतो; साक्षात् विधिवाक्य नसले, तरी नित्य अनुवादाने ही गोष्ट सिद्ध होते. विधि असल्यावांचून अनुवाद यावयाचाच नाही. येथें अनुवाद आहे, तेव्हां विधि आहेच असे सिद्ध होते. अध्यापन व अध्ययन ह्या दोन्ही अनुष्ठानांसंबंधाने विधिवाक्य आहे, असे समजून पूर्वीचे पूर्वपक्ष व सिद्धान्त हे निराळ्यारीतीनें येथे मांडता येतील. 'विचारशास्त्र' हा वादाचा विषय होय.