पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

E - - - पूर्वमीमांसा. (५) वेदाध्ययन झाल्यावर शिष्याने आपल्या घरौं येऊन स्नात होऊन गृहस्थाश्रमी व्हावें मा स्मृतिवाक्याला शास्त्र शिकण्यांत वेळ घालविल्यामुळे, बाध येत नाही. वेदाचें अध्ययन संपल्याबरोबर काही एक कालक्षेप न करतां, लागलीच समार्वतन करून लग्न करावे असा काही ह्या स्मृतीचा ( वेदमधीत्य स्वायात् ) अर्थ नाही. ह्या दोन्ही कृत्यांत नैरंतर्थ पाहिजे असें म्मति सांगत नाही. अनुक मनुष्य स्नान करून जेवतो, ( स्नात्वा भुंक्त ), असें म्हटले म्हणजे, तो मनुष्य स्नान करतो आणि पानावर बसतो असा अर्थ नाही. स्नान केल्यावर संध्यावंदनादिकमीत त्याचा वेळ जातो. असाच ह्या स्मृतिवाक्याचा अर्थ केला पाहिजे. ___ या सर्व कारणांवरून जैमिनीशास्त्र शिकावं असा विधि आहे, हे सिद्ध झाले. कुमारिल भट्टाचार्यांच्या पद्धतीने ह्या अधिकरणांतील हा सिद्धांत स्थापित झाला. प्रभाकरादि हाच सिद्धान्त दुसऱ्या रीतीने सिद्ध करतात. गुरु प्रभाकर या विषयाचा येणेप्रमाणे विचार करतात. आश्वलायन गृह्य सूत्रांत (१-१९-१) " अष्टवर्ष ब्राह्मणमुपनयीत तमध्यापयीत ” आठ वर्षाच्या ब्राह्मण मुलाचे उपनयन करावे आणि त्याला शिकवावे. असे सांगितले आहे. येथें अध्यापन करावे असा नियोग ( हुकूम, आज्ञा ) सांगितला आहे. आतां हुकूम दिला आहे कोणी ? तो हुकूम मानावा, त्या आज्ञेप्रमाणे कोणी वागावें? म्हणजे