पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. . . प्रस्थानभेद. कामी विधीला नियमाचे स्वरूप आले तरी विधीला काही बाधा होत नाही. ( ४ ) आतां पूर्वपक्ष असे प्रतिपादन करील की वेदाध्ययनाच्या बरोबर वेदाच्या अंगाचेहि अध्ययन होते. शिक्षा, व्याकरण व निरूक्त या तीन वेदांगांचें अध्ययन झाल्यावर वेदार्थ सहज समजूं लागेल. तर मग विचारशास्त्राचा ( जैमिनीसूत्रांचा ) आणखी अभ्यास कशाला करावयास हावा! ते शास्त्र शिकण निरर्थक आहे. हे पूर्वपक्षाचे म्हणणे असमंजसपणाचे आहे. कारण व्याकरणादि वेदांगें शिकून आपले कार्य होत नाही. वेदवाक्यांमध्ये बाध येतो, असें घाटले, किंवा त्यांच्या अर्थाबद्दल शंका वाटू लागली, तर विचारशास्त्रानेच असल्या गोष्टींचा निर्णय होत असतो. उदाहरणार्थ अक्ता शर्करा उपदधीत ( अक्त चोपडलेली अशी बारीक वाळू घालावी. ) असें वेदवाक्य आहे. याठिकाणी · अक्त कशानें ! तुपाने किंवा तेलानें ! ह्या गोष्टीचा निर्णय व्याकरणावरून किंवा निरूक्तावरून होणार नाही. विचारशास्त्राकडूनच ह्याचा निर्णय केला पाहिजे. अक्त म्हणजे तुपाने अक्त, तेलाने नव्हे; हा अर्थ विचारशास्त्राच्या साहाय्याने समजतो. · घृतं तेजः ' तूप हेच तेज आहे. तेजस्वीपणा आणावयाचा असेल तर तुपाचाच उपयाग केला पाहिजे. यासाठी तुपानेच शर्करा तुळतुळीत कराव्यात असा अर्थ केला पाहिजे. अशा गोष्टीवरून जैमिनीचे शास्त्राचें अध्ययन करणे भाग आहे, हे सिद्ध होते.