पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्वमीमांसा. आहे. अशा विभु व नित्य वेदांचे अध्ययन करणे अशक्य आहे. यासाठी वेदार्थाचा अवबोध ( ज्ञान ) ज्या शास्त्राच्या साहाय्यान होईल तें शास्त्र शिकले पाहिजे, म्हणजे जैमिनीच सूत्रांचा अभ्यास केला पाहिजे. असा नियम ह्या विधीपासून सिद्ध होतो. दर्शपूर्णमासांविषयों जे लोक अध्ययन करतात, ते त्या कर्माचा तत्त्वार्थ काय आहे, हे समजन घेण्याकरता त्याचा अभ्यास करीत असतात. वेदाध्ययन पुस्तकाचे पाठाने करावयाचे नसल्यामुळे, गुरूजवळ शिकण्यांत कांहीं एक विशेष संस्कार प्राप्त होत असतो. तो विशप संस्कार अर्थज्ञान होय. (२ ) दर्शपूर्णमासांचे सामान्य व प्रधान अपूर्वानें तदंगभूत अवघातादिकांची ( तांदूळ सडून घेणे वगैरे ) अवान्तर अपूर्वे नियमानें जशी बांधून टाकिली असतात, त्याचप्रमाणे सर्व यज्ञांची जी प्रधान व मुख्य अपूर्वे, त्यांनी कर्म, वेदाध्ययन, अर्थज्ञान इत्यादि यज्ञसाधनांची अपूर्वे बांधून टाकिली आहेत. म्हणून या नियमाप्रमाणे (वेदाचें) विशेप अर्थज्ञान झालेच पाहिजे. यासाठी जैमिनी सूत्रांचे अध्ययन करावें. (३ ) विश्वजिन्नयायाप्रमाणे वेदाचें अध्ययन केले म्हणजे स्वर्ग प्राप्त होतो, असे म्हणणे वाजवी नाहीं; कारण 'वंदाचें अर्थज्ञान' होणे हे जर दृष्टफल प्राप्त होत आहे, तर अदृष्ट फलाची ( स्वर्गप्राप्ति ) कल्पना करूं नये, अशा -