पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[११२ प्रस्थानभेद. म्हणणे आहे, ते आम्हास ( सिद्धान्त्यांस ) कबूल आहे. परंतु यासंबन्धौं नियमवाक्य सुद्धा नाही, असें ह्मणण्यांत अर्थ नाही. यासंबन्धी नियम आहे असें आमी म्हणतों, आणि साक्षात् इंद्र वज्र घेऊन आला, तरी त्याच्या हातून आमचे मत खोडले जाणार नाही. "स्वाध्यायोऽध्येतव्यः" ह्या विधिवाक्यांत ' अध्येतव्यः' ह्या शब्दाला ' तव्य ' प्रत्यय जोडलेला आहे. या प्रत्ययाचे अर्थात प्रेरणा किंवा आज्ञा याची भावना असते. आज्ञा झाली म्हणजे मनुष्याकडून प्रयत्न व कर्म झाली पाहिजेत; आणि मनुष्याला त्या कर्माचे दृष्टफल प्राप्त करून घ्यावयाचे असते. हे दृष्टफल मिळावे म्हणून त्या कर्माच्या योगाने साध्य होण्यासारखी अशी विशेष वस्तु त्याच्या पुढे असली पाहिजे. याला भाव्य म्हणतात. आतां प्रस्तुत विषयात हे भाव्य कोणते ? — नुसतें अध्ययन करा ' अशीच प्रेरणा किंवा आज्ञा आहे, असें ह्मणणे योग्य नाही. कारण मनुष्य अध्ययन करूं लागला, म्हणजे शब्दाचे उच्चार बरोबर करणे वगैरे, त्यासंबंधी ज्या ज्या क्रिया असतात, आणि त्या सर्व क्रिया करण्यास लागणारे श्रम तो मनुष्य करीतच असतो. मग 'तेच श्रम तूं कर ' असें जोराने त्यास सांगण्यांत काय अर्थ आहे. म्हणून तव्य ' प्रत्ययाचा हेतु हा नव्हे. हा त्याचा हेतु नसला तर स्वाध्यायोऽध्येतव्यः' या सर्व वाक्याप्रमाणे मनुष्याने सर्व वेद शिकावा असा त्या ' तव्या' चा अर्थ असेल. हे म्हणणेहि असमंजसपणाचे होईल. कारण वेद हा नित्य आणि विभु