पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्वमीमांसा १११ र्थ्याने त्या कर्माचें स्वर्ग हेंच फळ प्राप्त होईल, असें विश्वजिन्नयायाच्या अनुरोधाने मानिले पाहिजे. जैमिनीचे धर्मविचारशास्त्राचें अध्ययन करूं नये असें म्हणण्यास आप्पखी एक कारण आहे. “वेदमधीत्य स्नायात् " वेद शिकल्यावर मुलानें घरी येऊन समावर्तन करून लग्न करावें. अशी स्मृति आहे. वेद शिकल्यावर धर्मशास्त्र शिकण्यास पुनः गुरूचे घरी जाऊन राहिले पाहिजे. असें केलें तर वेदाध्ययन झाल्यावर समावर्तन करण्यास उशीर लागेल; आणि यामुळे स्मृतीची आज्ञा पाळली जाणार नाही. म्हणून स्मृतीला अनुसरून वेदाध्ययन झाल्याबरोबर समावर्तनच करावें. धर्मविचारशास्त्र शिकण्यास जाऊ नये. याप्रमाणे जैमिनीचें धर्मशास्त्र शिकण्याची अवश्यकता नाहीं असें सिद्ध करण्यास पूर्वपक्ष तीन कारणे सांगतो. १ जैमिनीचे शास्त्र शिकलेच पाहिजे असा विधि (वेदाज्ञा ) नाहीं. २ दुसरें, नुसतें वेदाध्ययन केल्याने स्वर्ग प्राप्त होईल. ३ तिसरे कारण वेदाध्ययन केल्यावर जैमिनीचे धर्मशास्त्र शिकण्यांत वेळ न घालवितां समावर्तन केले असतां स्मृतीची आज्ञा पाळल्यासारखे होईल. यांवर सिद्धान्तवाद्यांचे उत्तर येणेप्रमाणे आहे: १ विधिवाक्य नाही, कारण वेदाचा अर्थ समजून ध्यावा, हे अन्य रीतीने सिद्ध होते आहे. हे में पूर्वपक्षाचें