पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० प्रस्थानभेद. दुसऱ्या कोणत्याहि कारणाने तें ' अपूर्व' उत्पादित होत नाही. या गौण कर्माचे 'अपूर्व' साधनभूत व्हावे, याकरितां त्या त्या कर्मासंबन्धी विशेष नियम करून ठेवले आहेत. अर्थज्ञानपूर्वक वेदाध्ययन हा जो आपला प्रस्तुतचा विषय, त्यांत असला प्रकार कांहीं एक नाही. यज्ञकर्माचे अनुष्ठान यथाविधि होण्यास (वेदाचें) अर्थज्ञान हावें ही गोष्ट खरी; परंतु अध्ययनाचेवेळी झालेले वेदार्थज्ञान, किंवा लिहून ठेवलेले ग्रन्थ वाचून होणारे वेदार्थज्ञान, ह्या दोन्ही ज्ञानांपैकी कोणत्याहि ज्ञानाने यज्ञानुष्ठानाची सिद्धि होते, असे आहे तर वेदाचें अर्थज्ञान होण्यास अमूक एक ग्रन्थ शिकलाच पाहिजे, असे नियम करण्याची काही जरूरी नाही. म्हगून जैमिनीचे धर्मशास्त्र शिका' असा नियमविधि सांगता येत नाही. ____ असे झाले तर "स्वाध्यायोऽध्येतव्यः" हे जें आपलें मुख्य विधिवाक्य, त्याची वाट कशी काय लावावयाची! असे कोणी विचारील तर त्यांस पूर्वपक्ष करणारे वादी असे उत्तर देतातकेवल वेदाक्षरांचे अध्ययन करावें. नुसता वेद तोंडपाठ केला, म्हणजे पुरे झाले. त्यापासून स्वर्गप्राप्ति होते. स्वर्ग हे त्याचे फल आहे. असे म्हणण्यास ‘विश्वजित् । न्यायावरून कांहीं एक हरकत नाही. (३-४-१५ ). विधि सांगितला नसनहि एखाद्या कर्माचे दृष्टफळ मिळत असल्यास त्या कर्माविषयी विधि सांगण्यांत काही अर्थ नाही. एखाद्या कर्माविषयी विधि सांगितला असेल तर त्या विधीच्या साम