पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्वमीमांसा अध्ययन करणे म्हणजे त्याचा अर्थ समजून घेऊन तो शिकणे असे आहे. ( प्रतिज्ञा ) . कारण अध्ययन करणे असें म्हणतों ह्मणून. ( हेतु ). कोणत्याहि ग्रन्थाचें अध्ययन करणे म्हणजे त्यांचा अर्थ समजून घेऊन शिकणे होय. उदाहणार्थ, भारतादि ग्रन्थांचें अध्ययन. ( व्याप्ति व दृष्टान्त ) वेदाचें अध्ययन करणे आहे. ( उपनय ). म्हणून वेदाचा अर्थ समजून घेऊन तो शिकणे आहे, हा सिद्धान्त. (निगम ). ह्याप्रमाणे वेदार्थज्ञान करून घेऊन अध्ययन करावे, ही गोष्ट आम्हांस अनुमानावरूनच जर कळून येते आहे, तर ते सांगण्यास आणखी एखादे विधिवाक्य कशाला पाहिजे ? ' म्हणून जैमिनीचें धर्मशास्त्र शिका' असा विधिच नाही. ( हुकूम नाही. ). २ 'जैमिनीचे धर्मशास्त्र शिकावें' असा पाक्षिक नियमविधि आहे असे म्हटले, तर तेंहि लागू पडत नाही. साळीपासून. तांदूळ काढण्याची अनेक साधनें असूनहि दर्शपूर्णमासाच्या इष्टीचे वेळी करण्याच्या पुरोडाशास, उखळांत भात सडून काढलेलेच तांदूळ घ्यावेत असें सांगितले आहे. हा नियम बांधून टाकला आहे. ह्याला कारण आहे. दर्शपूर्णमासांचे में प्रधान मुख्य · अपूर्व ' ( अदृष्टफल ) तें उत्पन्न करण्यास, दर्शपूर्णमासाच्या अंगभूत असलेल्या कर्माची ' अपूर्वे ' साधन असतात. म्हणजे तांदुळाच्या पिठाचा पुरोडाश करावा इत्यादि जी कर्मे दर्शपूर्णमांसाची अंगें असतात, त्या कर्माच्या अपूर्वीच्या साहाय्यानेच दर्शपूर्णमासांचे प्रधान ' अपूर्व उत्पन्न होत असते.