पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. ज्ञान हे अवश्य आहे, आणि विचारशास्त्राशिवाय अर्थज्ञान जर होणार नाही, तर जैमिनीच्या ग्रन्थासारख्या विचारशास्त्राचे अध्ययन केलेच पाहिजे. हे मत ज्यांचे आहे, त्यांस पूर्वपक्षी दोन प्रश्न विचारतात. १काय हो! वेदाचा अर्थ समजण्याकरितां जैमिनीचे धर्मशास्त्र वाचलेच पाहिजे का? नाहीं वाचले तर चालणार नाही का ? वेदाचे अर्थज्ञान होण्यासाठी जैमिनीची सूत्रे शिकलोंच पाहिजेत असें विधिवाक्य आहे, असें आपलें म्हणणे आहे काय ? किंवा ( २ ) वेदाचा अर्थ ! समजण्यास अनेक मार्ग असतांहि, काही विशेष कारणास्तव अर्थज्ञानासाठी हेच धर्मशास्त्र पडले पाहिजे, असा हा पाक्षिक विशेष नियम आपण घालून देताहां! उदाहरणार्थ:--साळीपासून तांदूळ काढण्यास नखांनी सोलणे इत्यादि अनेक साधने असतांहि, दर्शपूर्णमासाच्या वेळी पुरोडाश करण्यास जे तांदूळ घ्यावयाचे, ते उखळीत भात कांडून तयार केलेले असे तांदूळ असा. वेत, हा नियमविधि घालून दिला आहे, त्याप्रमाणेच धर्मशास्त्राचे द्वारा वेदार्थज्ञान करून घेतले पाहिजे असा नियम आपला आहे किंवा काय ? १ धर्मशास्त्र शिकले पाहिजे असें विधिवाक्य आहे, असे जर तुम्ही म्हणाल, तर तुमच्या म्हणण्यांत अर्थ नाही. कारण, विधिवाक्याची अपेक्षा न धरतां केवल अनुमानानेच वेदाचा अर्थ समजून घेऊन वेदाध्ययन करावे, ही गोष्ट सिद्ध होते. ती कशी होते तें आतां पुढील अनुमानवाक्यांवरून स्पष्ट दिसून येईल. वेदाचें