पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्वमीमांसा. १०७ अधिकरणांत युक्तिवादाने विवेचन करण्याची कशी काय पद्धति असते, ह्याची स्थूल मानानें तरी थोडीशी कल्पना यावी, म्हणून एक दोन अधिकरणांचा सारांश देणे अवश्य आहे, असें वाटल्यावरून तो होईल तितक्या स्वल्प व सोप्या भाषेत पुढे दिला आहे. वेदाचें अध्ययन करावें, हे अधिकरण आहे. स्वाध्यायोऽध्येयव्यः वेदाचें अध्ययन करणे अगदी अवश्य आहे. हा ह्या अधिकरणांतील विषय होय, “चोदनालक्षणोऽर्थोधर्मः" या सत्रापासून आरंभ करून शेवटचे में "अन्वाहार्येच दर्शनात्" ह्या सूत्रापर्यंत जैमिनीनी केलेलें धर्मशास्त्र, हे वेदाचें अध्ययनाबरोबर शिकावे किंवा शिकू नये? ही त्या विषयावर शंका उत्पन्न होते. ह्या शंकेवरून काही लोकांचे असें मत होईल की, वेदाध्ययनापासून प्राप्त होणारे दृष्ट फळ किंवा पुढे होणारे अदृष्ट फळ, या दोन्ही फळांचा विचार करून पहातां जैमिनीच्या धर्मसूत्रांचे अध्ययन करण्याची काहींएक जरूरी नाही. मुख्य विषयाचे संबन्धाने हा पूर्वपक्ष झाला. आपलें ( पूर्वपक्षाचें ) मत स्थापित करण्यासाठी त्या पक्षाचे लोक युक्तिवाद करतात तो असा. वेदाध्ययन करण्याच्या संबन्धाने दोन मते आहेत. १ वेदाची अक्षरें नुसती तोंडपाठ केली, की झाले वेदाध्ययन, असें कांहींजणांचे मत आहे. ह्या मताविषयी विचार पूर्वपक्षीय ( वादी) येथे करीत नाहीत. अन्य लोकांचे असे म्हणणे आहे की, वेदाध्ययनांत वेदाच्या अर्थाचे ज्ञान झालेच पाहिजे. अर्थ.