पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ प्रस्थानभेद. १० दहाव्या अध्यायांत बाध सांगितले आहेत. प्रधानकर्म न केल्यामुळे, तदधीन गौण कर्म न करणे, एका कर्माचे फळ दुसऱ्या कर्माच्या अनुष्ठानाने उत्पन्न झाले असतां, तें कर्म न करणे, ग्रहादि प्रकरणे, साम आणि निषेधअर्थ, ह्या विषयांचा विचार केला आहे. ११ अकराव्या अध्यायांत तंत्र आणि अवाप यांचा सविस्तर विचार केला आहे. अनेकवेळी करण्यास सांगितलेले कर्म एका वेळीच करून अनेक वेळांचे काम भागविणे, यास तन्त्र म्हणतात. अवाप म्हणजे जितके वेळां कर्म करण्यास सांगितले असेल, तितके वेळा तें करणे. १२ बाराव्या अध्यायांत प्रसंग, तंत्र, निर्णय, समुच्चय, ( अनेक कर्मे एका वेळी करणे ) आणि विकल्प ( करावे किंवा न करावें ), ह्यांचा विचार केला आहे. ह्या बारा अध्यायांत अनेक विषयांचे विवेचन केले आहे, हे स्पष्टच आहे. एका विषयाचे संपूर्ण विवेचनास एक अधिकरण म्हणतात. अशी अधिकरणे दोन्ही मीमांसांत आहेत. प्रत्येक अधिकरणाचे पांच भाग किंवा अंगे असतात. १ विषय, २ त्याविषयी संशय. ३ शंका येणाराचा पूर्व पक्ष. ४ शंका निवारण करणाराचा सिद्धान्त आणि ५ संगति. अशी अधिकरणें कर्ममीमांसेंत ९०७ आहेत. एकंदर सर्व सूत्रे २७४५ आहेत. प्रत्येक अध्यायांत चार पाद असतात. परंतु ह्यांतील तिसऱ्या, सहाव्या आणि दहाव्या अध्यायांत आठ आठ पाद आहेत. म्हणन पूर्वमीमांसेंत एकंदर ६० पाद आहेत.