पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्वमीमांसा. चौथ्या अध्यायांत क्रत्वर्थ आणि पुरुषार्थ यांच्या भेदांवरून विशेष प्रयोग कसे असावेत हे सांगितले आहे. प्रधान व अप्रधान कर्माचे इतर कर्मासंबंधी प्रयोजकत्व, जुहुपर्णता इत्यादिकांचे फल; राजसूययज्ञाचे अक्षद्यतादि जे गौण भाग, यांचा विचार केला आहे. ५ पांचव्या अध्यायांत श्रुति इत्यादिकांचा अनुक्रम, कर्माची वृद्धि किंवा अवर्धन, श्रुति वगैरेच्या अनुक्रमाने त्यांचे प्राबल्य किंवा दुर्बलता, इत्यादि विषयांचे प्रतिपादन येथे केले आहे. ६ सहाव्या अध्यायांत ( कर्म करण्यास ) अधिकारी, त्याचे धर्म, द्रव्यप्रतिनिधि. ( एखादें द्रव्य नसले तर त्याचे जागी घेण्यासारखें दुसरें द्रव्य ), अर्थाचा किंवा कर्मांचा लोप, प्रायश्चित्तें, सत्रांत देण्यासारख्या वस्तु ( देय ), आणि यज्ञकर्मातील आग्नि, या गोष्टींचा विचार केला आहे. ७ सातव्या अध्यायांत श्रुतीचे प्रत्यक्ष वचन नसले, तर नाम आणि लिंग ह्यांच्या आधारावरून अतिदेश करणे, याचा विचार केला आहे. कोणत्याहि एकाद्या कर्मीत जो प्रयोग किंवा तंत्रादि सांगितली असतील, ती सर्व तशीच्या तशीच दुसऱ्या एकाद्या कर्मीत करणे, यास अतिदेश म्हणतात. ८ आठव्या अध्यायांत प्रबल, स्पष्ट आणि अस्पष्ट अशा लिंगाच्या आधाराने ( संदर्भ ) करण्यासारखा अतिदेश व त्यांस अपवाद, ह्या गोष्टींचा विचार केला आहे. ९ नवव्या अध्यायांत नवीं सूक्तं घ्यावी किंवा नाही, याचा विचार ( ऊह ) , सामोह आणि मंत्रोह आणि त्यांच्या संबन्धाने प्रसंगोपात्त गोष्टी, यांचा विचार आहे.