पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. आपल्या अभिमताची (इष्ट वस्तूची ) प्राप्ति व्हावी, म्हणून धर्माप्रमाणे वागावे, असे सांगतात, तर धर्म म्हणजे काय ? याचे उत्तर या ग्रन्थांत भगवान् जैमिनीनी दिले आहे. “ अथातो धर्मजिज्ञासा" हे पहिल्या अध्यायाचें पहिले सूत्र आहे. धर्म म्हणजे काय हे समजन घेण्याची इच्छा ( सर्वात असावी), अशारीतीने प्रतिपादनास आरंभ केला आहे. १ पहिल्या अध्यायांत विधि, अर्थवाद, मंत्र, स्मृति आणि नामधेय, यांच्या प्रामाण्याविषयी विचार केला आहे. २ दुसऱ्या अध्यायांत कांच्या भेदाविषयी चर्चा केली आहे. प्रमाणांचे अपवाद म्हणजे खोटी प्रमाणे, आणि कर्मांच्या प्रयोगामधील भेद, त्यांचे विवेचन केले आहे. ३ तिसऱ्या अध्यायांत शेषाशेषिभाव सांगितला आहे. श्रुति लिंग--वाक्य इत्यादिकांमधील विरोध, व तो विरोध आला असतां प्राधान्य कोणास द्यावें, ह्याचा विचार केला आहे. तसेंच प्रतिपत्तिकाचाहि विचार केला आहे. प्रतिपत्तिकमै म्हणजे, यज्ञांत उपयोगांत आणलेल्या द्रव्यांपैकी अवशिष्ट भागांचे काय करावयाचे, ह्याविषयी सांगितलेली कर्मे, पशु मारल्यावर त्याचे चर्म व अस्थि. यांचे काय करावयाचे, सुरेचे हवन झाल्यावर बाकी राहिलेल्या सुरेचे काय करावयाचें ? इत्यादि. अनारंभाधीत, मुख्य प्रधान कर्मास उपकारक अशी प्रयाजादि कर्मे, आणि यजमानाचे कर्तव्य, इतके विषयांचे तिसऱ्या अध्यायांत विवेचन आहे. ४