पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्वामांसा. विभागापासून विभाग होतात हे एक तिसरे वैशेषिकांचे मत आहे. विभागजविभाग दोन प्रकारचे असतात, कारणमात्र विभागज, आणि २ कारणाकारण विभागज. वैशोषिक आणि न्याय ह्या दर्शनांवर वात्स्यायनांचे भाष्य आहे. पूर्वमीमांसा. मीमांसेचे पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असे दोन भाग आहेत. पूर्वमीमांसेला धर्ममीमांसा किंवा जैमिनीसूत्रं, असेंहि म्हणतात. पूर्वमीमांसा हा सूत्रात्मक ग्रन्थ जमिनीनी प्रणीत केला आहे. याचे बारा अध्याय आहेत. याप्रमाणेच संकर्षणकाण्ड या नांवाचा चार अध्यायांचा ग्रन्थ उपासनामार्गावर जैमिनीनी लिहिला आहे. हा देवताकाण्ड या नावाने प्रसिद्ध आहे. उपासना म्हणजे एक प्रकारचे कर्मच होय. ह्या ग्रन्थांत उपासना कर्माचे प्रतिपादन केले आहे. म्हणून कर्ममीमांसेंत त्या ग्रन्थाचा अन्तर्भाव होतो, असे कोणी मानतात. " वात्स्यायनांचे भाष्य, जयंवृत्ति, विश्वनाथांची वृत्ति, कुसुमांजलि, तर्कभाषा, प्रशस्तपादभाष्य, किरणावलि उपस्कार, भाषापरिच्छेद, सिद्धान्तमुक्तावलि, तर्कसंग्रह, दीपिका सप्तपदार्थी, तत्वचिंतामणी, दीधिति, गदाधरी, कृष्णभट्टी तकौमुदी, न्यायमालाविस्तार, मानमनोहर, इत्यादि लहानमोठे अनेक ग्रंथ आहेत."