पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ प्रस्थानभेद. लेखण्यांमध्ये विवेक ( भेद ) करीत असतो. ह्यामुळे वस्तूंत द्वित्व ( दुसरेपणा, भिन्नता ) उत्पन्न होते. हे द्वित्व अपेक्षा बुद्धीवर अवलंबून असल्यामुळे तें अनित्य असते. तशीच अपेक्षाबुद्धि हीहि अनित्य आहे, हे एक वैशेषिकांचे मत आहे. ___ पदार्थास उष्णता लागली असतां, (विस्तव वगैरेची आंच मिळाली असतां), त्या पदार्थाच्या गुणांत विकार होतो, म्हणजे पूर्वी जे गुण त्या पदार्थात असतात, ते जाऊन दुसरे गुण त्यांत उत्पन्न होतात. ह्याला पाकजोत्पत्ति म्हणतात. झाडावरून आंबा तोडावा, तो त्यावेळी हिरव्या रंगाचा असतो आणि त्याची चव आंबट असते. हा पिकत घालून ( म्हणजे त्यास उष्णता दिल्यावर ) बाहेर काढला म्हणजे, तो पिवळा होतो आणि गोड लागतो. हा परिणाम पाकाचा आहे, असें वैशेषिकांचे मत आहे. हा विकार पदार्थाच्या (आंब्याच्या ) द्वयणुकांत होतो, म्हणजे पूर्वीच्या पदार्थाचे ( आंब्याचे ) सर्व मूळ अवयव नष्ट होऊन दुसरे द्वयणुक तयार होऊन निराळाच आंबा होतो, असें वैशेषिक म्हणतात. नैयायिकांच्या मतापमाणे हा परिणाम किंवा विकार एकंदर सर्व पदार्थात होतो. त्याच्या अवयवांत होत नाही. येवढा ह्या दोघांच्या मतांत फरक आहे. वैशेषिकांस पालुपाकवादी म्हणतात, आणि नैयायिकास पिठरपाकवादी असें नांव आहे. पीलुपाक म्हणजे अणूंचा पाक, आणि पिठरपाक म्हणजे अणूनी बनलेल्या सर्व वतूंचा पाक.