पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वैशेषिक दर्शन. १०१ विशेष हा सहा पदार्थापैकी एक स्वतंत्र पदार्थ आहे. हे मत वैशेषिकांनीच प्रथम प्रतिपादन केल्यामुळे त्यांस वैशेषिक हे नांव मिळाले, हे पूर्वी सांगितलेच आहे. जेथें सामान्य आहे तेथें विशेष असलाच पाहिजे, आणि विशेष दृष्टीस पडला की, त्याचे सामान्य असावयाचेंच, असा नियम आहे. वैशेषिक मताभिमानी कोणास म्हणावें असें कोणी विचारले तर त्यास उत्तर पुढल्या श्लोकांत दिले आहेःद्वित्वे च पाकजोत्पत्तो, विभागेच विभागजे ॥ यस्य न स्खलिता बुद्धिस्तं वै वैशेषिकं विदुः ॥ इंद्रियार्थ संनिकर्षाने म्हणजे इंद्रिय आणि एकादी (त्या इंद्रियाला ओळखतां येणारी) वस्तु या दोहोंचा संयोग झाला म्हणजे ती वस्तु एक आहे, असे आपल्यास ज्ञान होते. असें ज्ञान प्रत्येक वस्तूच्या संबंधाने होते. म्हणजे ती वस्तु पाहिली म्हणजे ती एकच आहे, असे आपल्यास समजतें. म्हणन वस्तूंमध्ये त्यांचे एकत्व हे नित्य असते. उदाहरणार्थ मी आतां एक लेखणी पाहिली, तिच्यांत तिचे एकत्व आहे. पुनः दुसरी एक लेखणी पाहिली. ह्या दुसऱ्या लेखणीत तिचे स्वतःचे एकत्व आहेच. परंतु पहिल्यांदा पाहिलेली ही एक लखणी, दुसऱ्यांदा पाहिलेली ही लेखणी, अशा ह्या दोन तीन चार इत्यादि, ह्या लेखण्या, असा विचार जेव्हां मी मनांत करतो, त्या वेळी माझ्या मनांत अपेक्षाबुद्धि उत्पन्न झाली असते, त्या अपेक्षाबुद्धीने मी त्या अनेक