पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेदः सामान्याचे दोन विभाग होतात. सत्ता ही परसामान्य होय. जाति ही अपरसामान्य असते. विशेष हे अनन्त असतात. ते परमाणुसामान्यादिकांशी समवायसंबन्धाने जोडलेले असतात. समवाय हा एकच पदार्थ आहे. समवायाचे अनेक प्रकार आहेत. अवयव व अवयवी, गुण व गुणी, जाति व व्यक्ति, इत्यादिकांमध्ये जो संबन्ध त्यास समवाय ह्मणतात. याप्रमाणे सर्व पदाथाची व्यवस्था या दर्शनांत सविस्तर केली आहे. द्रव्यांचे परमाणु असतात ही कल्पना प्रथम कणादमुनीनींच काढली आणि तिचे प्रतिपादन केले, म्हणून परमाणुवादाची उपस्थिति वैशेषिक दर्शनांत पहिल्यांदा झाली. एखाद्या द्रव्याचे भाग करीत गेले तर शेवटीं परमाणूपर्यंत ते भाग होत जातील. परमाणूंच्या पुढे त्यांचे अधिक सूक्ष्म भाग होत नाहीत. ते अतिसूक्ष्म आहेत. इन्द्रियांस दिसत नाहीत. प्रत्येक परमाणु एकटा, स्वतंत्र, नित्य, असा आहे. त्याला जाति नाही. सर्व विशेष यांच्याशी समवाय संबन्धानें जुडलेले असतात. ह्या एकेका अणूंचा दुसऱ्या अणूशी संयोग होऊन द्वयणुक बनतात. असल्या व्यणुकांच्या संयोगानें त्र्यणुक वगैरे होतात. व्यणुकादि सर्व अनित्य आहेत. ह्यांपासूनच सर्व सृष्टि झाली आहे. परमाणु हेच सृष्टीचे उपादान कारण होत. प्रकृति ही उपादान कारण नव्हे.