पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वैशेषिक दर्शनः ९९ पदार्थ आहेत, असें वैशेषिकांचे मत आहे. ह्या पदार्थीसच उद्देश ह्मणतात. त्यांची लक्षणे व परीक्षण या ग्रन्थांत केलेली आहेत. ह्या सहा पदार्थाचा जो अनुक्रम दिला आहे, तो सकारण आहे. त्यांत बदल करता येणार नाही. द्रव्य हे सर्व पदार्थांचे आयतन आहे, म्हणून ते पहिल्यांदा सांगितले आहे. गुण सर्व द्रव्यांत आहेत, ह्मणून ते ह्या क्रमांत दुसरे आहेत. द्रव्यगुणांप्रमाणेच कर्माची जाति असते, म्हणून कर्म तिसरें आले आहे. पहिल्या तिन्ही वर्गात सामान्य असते, ह्मणून त्यांचे नंतर सामान्य आहे. तसेच विशेष अनन्त असून ते पहिल्या तिन्ही पदार्थात समवेत असतात, आणि सामान्याचे पोटांत येतात, ह्मणून सामान्याचे मागून ते आले आहेत. समवाय एकच आहे, तो शेवटी आला. अभाव हा सातवा पदार्थ आहे, ही गोष्ट निषेधमुखाने ठरविता येईल ह्मणून अभाव हा सातवा पदार्थ मानिला आहे. द्रव्याचे नऊ पोटभाग आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, काल, दिक्, आत्मा व मन, ही नऊ द्रव्ये होत. गुण २४ प्रकारचे असतात, रूप, रस, गन्ध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथक्त्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, बुद्धि, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, संस्कार, अदृष्ट (धर्माधर्म), आणि शब्द, याप्रमाणे चोवीस गुण आहेत. उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसारण, आणि गमन, असे कर्माच पांच प्रकार आहेत. कोणत्याहि इतर कर्माचा अन्तर्भाव ह्या पांचांपैकी कोणते तरी एकांत होतो. पर आणि अपर असे