पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. ८ आठव्या अध्यायांत, ज्ञानोत्पत्ति व त्याचे निदान, यांचे निरूपण आहे. १ ल्या आन्हिकांत लौकिक सन्निकर्षजन्य सविकल्प आणि निर्विकल्प ज्ञानाची निष्पत्ति व तिचा क्रम ही सांगितली आहेत. २ दुसऱ्या आन्हिकांत ( संनिकर्षज लौकिक ) विशिष्टवैशिष्टयप्रत्यक्ष ज्ञानाचे निरूपण केलें आहे. ९ नवव्या अध्यायांत बुद्धिविशेषांचें युक्तिपूर्वक स्थापन ( म्हणजे प्रत्यासत्तिजन्य, लौकिक व अलौकिक प्रत्यक्षाचे उपपादन) केले आहे. पहिल्या आन्हिकांत योगिप्रत्यक्ष व अयोगिप्रत्यक्ष, यांचे निरूपण, कारण, स्वरूप व लक्षण,यांवरून केले आहे. आणि प्रत्यक्ष ज्ञान व लैंगिक ( अनुमानानें निष्पन्न झालेलें ) ज्ञान यांमधील भेद दाखवून प्रमाणाचे तदनुरूप दोन विभाग केले आहेत. १० दहाव्या अध्यायांत आत्म्याच्या मुख्य गुणाचे भेद, कारण दाखवून स्पष्ट करून दाखविले आहेत. पहिल्या आन्हिकात सुख व दुःख याचे परीक्षण केले आहे. दुसऱ्या आन्हिकांत समवायी, असमवायी, आणि निमित्त, अशी जी तीन कारणे आहेत, त्याचे निरूपण केले आहे. ____ ह्या दर्शनांत उद्देश, लक्षण, आणि परीक्षा, अशा तीन विष. यांचे प्रतिपादन केले आहे. विश्वांतील सर्व पदार्थाचे वर्गी करण केले तर त्यांचे मुख्य सहा वर्ग होतात. द्रव्य, गुण कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय, हेच सहा मुख्य