पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वैशेषिक दर्शन. ५ पांचव्या अध्यायांत कर्मपरीक्षा आहे. १ ल्या आन्हिकांत प्रयत्नापासून निष्पन्न होणारी कर्मे, यांचे परीक्षण आहे. उत्क्षेपण, अप्रयत्नोत्क्षेपण, पुण्यहेतुककर्म, पुण्य व पाप यासंबंधी उदासीन असणारे कर्म, ही सर्व शरीराची कम होत. २ या आन्हिकांत चोदनेपासून निष्पन्न होणाऱ्या कर्माचें विवेचन आहे. ह्या कर्मास मानसिक कम म्हणतात, ( सूत्रं ४४ ). ६ सहाव्या अध्यायांत श्रौतधर्माची परीक्षा आहे, म्हणजे संसाराचे मूळ जे धर्म व अधर्म त्यांचे परीक्षण केले आहे. १ ल्या आन्हिकांत धर्माचे मूळ जो वेद त्याचे उपपादन व्हावे, म्हणून गुणजन्यत्व धर्म साधण्यास साधन आहे, असे सांगितले आहे. २ यांत धर्माचे परीक्षण करण्यासाठी दृष्ट आणि अदृष्ट कर्माच्या फलांचे विवेचन केले आहे. ___ ७ सातव्या अध्यायांत गुणत्वानें गुणाचे परीक्षण केलें आहे. ( गुण आणि समवाय यांचे प्रतिपादन केलें आहे ). १ ल्या आन्हिकांत गुणांचे उद्देश व लक्षणे सांगितली आहेत. नित्य, व अनित्य ह्या दृष्टीने गुणांची परीक्षा, पाकजगुण, संख्यादि अनेकवृत्तींचे, गुण आणि परिमाण, यांचे परीक्षण आहे. २ या आन्हिकांत एकानेकवृत्ति, व अनेकमात्रवृत्ति अशा गुणांचे परीक्षण आहे. त्याप्रमाणे शब्दार्थसंबंध, विशेषगुणरहितविभुसंयोग इत्यादि, आणि समवाय यांचे विवेचन केलेलें आहे.