पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थान द. कांत द्रव्य, गुण, आणि कर्म ह्यांमध्ये कार्यकारणभावाची व्यवस्था आहे असे वार्णलं आहे. २ दुसऱ्या अध्यायांत द्रव्याचे निरूपण आहे. १ पहिल्या आन्हिकांत पृथ्वी, आप, ( पाणी) तेज, वायु, आकाश, काल, दिक्, आत्मा आणि मन ही नऊ द्रव्ये होत, यांची लक्षणे सांगितली आहेत, आणि दुसऱ्या आन्हिकांत गंधादि गुणांचे स्वाभाविकत्व आणि औपाधिकत्व यांच्या व्यवस्थेचे वर्णन आहे. ३ तिसऱ्या अध्यायांत, आत्मा व अन्तःकरण यांची लक्षणे सांगितली आहेत. पहिल्या आन्हिकांत आत्मपरीक्षा आहे, व दुसन्यांत मनाचे परीक्षण करून, त्याच्याद्वारे हेतु आणि हेत्वाभास ह्यामधील विवेक (भेद) दाखविला आहे. (सूत्रं १९). - - - - - ४ चवथ्या अध्यायांत शरीर व तदुपयोगी यांचे विवेचन आहे. १ पहिल्या आन्हिकांत परमाणु हे मूल कारण आहेत ते सत्, नित्य आणि अकारणवत् असे आहेत. ते. कार्याचे कारण आहेत, असें वर्णन केले आहे. यामुळे प्रकृति ही मूळ कारण आहे, ह्या तत्त्वाचा निरास होतो. २ या आन्हिकांत पृथ्वीत्यादिक चार कार्यद्रव्यांचे विभाग सांगितले आहेत. शरीर, इंद्रिय आणि विषय हे कार्यद्रव्यांचे विभाग होत. ( सूत्रे २४ ).