पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वैशेषिक दर्शन. पुराणाच्या वेळी तरी हे दोन निराळे पुरुष आहेत असें मानिले होते. वैशेषिकदर्शन अक्षपादाचे दर्शनाहून प्राचीन आहे. दोहोंमध्ये पदार्थज्ञान, परमाणु, व्याप्ति, हेत्वाभास, जीवात्मा, इत्यादि विषयांत साम्य आहे. दोहोंमध्येहि ईश्वरविषयक विचारास प्राधान्य दिलेले नाही. वैशेषिक दर्शनाचे दहा अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायांत दोन दोन भाग आहेत त्यास आन्हिक म्हणतात. ह्या ग्रन्थांत एकंदर सूत्रं ३७० आहेत. मोक्षप्राप्ति करून घ्यावयाची असेल तर तत्त्वज्ञान झाले पाहिजे. धर्मविशेषापासून आणि पदार्थाचें साधर्म्य व वैधये ओळखल्यावर तत्त्वज्ञान होते. कणादानी पहिल्याच सूत्रांत धर्माची व्याख्या आम्ही सांगतो असे म्हणून, दुसऱ्या सूत्रांत धर्माची व्याख्या सांगितली आहे. “ ज्यापासून अभ्युदय व निश्रेयस यांची सिद्धि होते तो धर्म होय." ( अथातो धर्म व्याख्यास्यामः ॥ १॥ यतोऽभ्युदयनिश्रेयसः सिद्धिः सः (धर्मः)॥२॥) १ पहिल्या अध्यायांत समवेत अशेष पदार्थ सांगितले आहेत. याच्या पहिल्या आन्हिकांत वेदमूल असा धर्म सांगून १ द्रव्य, २ गुण, ३ कर्म, ४ सामान्य, ५ विशेष आणि ६ समवाय ह्या मुख्य सहा पदार्थांचे परीक्षण करण्यासाठी द्रव्य, गुण, कर्म, यांचे निरूपण केले आहे. २ या आन्हि