पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद तील इंडक्टिव व डिडाक्टव हैं जें मुख्य भाग, त्यांची कल्पना ह्या परार्थानुमानाच्या पंचावयवी वाक्यांत चांगली दिसून येते. तथापि तर्कशास्त्राच्या ह्या दोन भागांस आज में पूर्ण स्वरूप आलेले आहे ते सर्व त्या वेळच्या लोकांस समजले होते, असे म्हणणे मात्र वितण्डवाद होईल, वैशेषिक दर्शन. वैशेषिकदर्शन हे कणादमहामुनीनें प्रणीत केले आहे. हा ग्रन्थ न्यायशास्त्रावरचाच आहे. ह्या दर्शनांत मुख्य पदार्थ सहा मानिले आहेत. त्याच्यांत · विशेष ' हा पदार्थ अगदी नवीनच असल्यामुळे आणि ह्या पदार्थास विशेष महत्त्व दिल्यामुळे ह्या दर्शनास वैशेषिक दर्शन हे नांव मिळाले आहे. त्याचप्रमाणे कणाद हेहि ग्रन्थकर्त्याचे मूळ खरें नांव नसावे. ह्या शास्त्रांत द्रव्याचे परमाणू असतात, हे तत्त्व मोठ्या जोराने प्रतिपादले आहे. ही नवीन अश्रुत कल्पना लोकांस मान्य न होऊन ग्रन्थ कयास थट्टेनें कण ( अणु ) भक्षण करणारा ( कणाद-कणभुक्-कणभक्षक ) असें ते ह्मणू लागले. औलुक्यदर्शन असेंहि वैशेषिक दर्शनास नांव आहे. ( हेमचन्द्रकृत अभिधानचिन्तामाण ) परंतु कणादाचे उलुकि हे नांव असावे, असे दिसत नाही. कारण वायुपुराणांत अक्षपाद; कणाद उलुकि आणि वत्स हे शिवाचे पुत्र होते असे सांगितले आहे. ह्मणजे त्या