पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न्यायदर्शन. असेल, तर आत्मा नित्य असल्यामुळे त्याचा उच्छेद होणे अशक्यच आहे. ह्याप्रमाणे बौद्धमतांतील विज्ञानवादी, जैन, चार्वाकपक्षीय, सांख्यवादी, भट्टसर्वज्ञ, इत्यादि लोकांच्या मतांचे खंडन करून, किंवा त्या मतांचा स्वीकार केला असता, त्यांत अडचणी काय येतात हे सांगून दुःखाची अत्यंत निवृत्ति हेच निश्रेयस आहे असें नैयायिक प्रतिपादन करितात. ईश्वराचे सद्भावांविषयी अनेक शंकांचे निरसन न्यायशास्त्रांत केलेले आहे. द्रव्यांपैकी चार द्रव्यांचे परमाणु असतात. ते नित्य व अतीन्द्रिय आहेत. तेच उपादानकारण आहेत. आत्मा नित्य आहे. तो प्रत्येक शरीरांत निरनिराळा असतो; याप्रमाणे अनन्त आत्मे आहेत. मन अणु आहे. विषय, ( एकादी वस्तु ) इंद्रिय, मन आणि आत्मा यांचा संनिकर्ष (संयोग) झाला म्हणजे विषयाचे प्रत्यक्ष ज्ञान उत्पन्न होते. न्यायशास्त्र वैशेषिक शास्त्राच्या मागून झालेले असावे. ह्या शास्त्राचे महत्त्व व त्याची विशेष उपयुक्तता, त्यांत प्रतिपादन केलेल्या अनुमानाचे पंचावयवी बाक्यामुळे व प्रमाणहेत्वाभासादि विषयांवरून, ती स्पष्ट दिसून येतात. व्याप्तिज्ञान करून घेणे, व्याप्य जथे आहे, तेथें व्यापक असते. व्यापक ज्या ठिकाणी नाही तेथें व्याप्य नसावयाचेंच, इत्यादि नियमावरून निर्णय करणे इत्यादि गोष्टीची अवश्यकता सत्य जाणण्यास किती आहे, हे त्यावेळी चांगले समजले होते. आधुनिक तर्क शास्त्रां - --