पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-- --- - प्रस्थानभेद. ण्यास अप्रवृत्त जो मनुष्य आहे त्याला दुःख होते, असे कोणीहि प्रतिपादन करणार नाही. २ बौद्धमतांतील माध्यमिक पंथी लोकांचे आत्मोच्छेद हाच मोक्ष आहे असें मत आहे. आत्मा नाहीसा झाला की, दुःखहि नाहीसे झाले. दुःखाचाच उच्छेद झाला पाहिजे असा ह्या मताचा अर्थ आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. ३ आतां कोणी म्हणतील की दुःखाचा उच्छेद करावयाचा असेल, तर आत्म्याचाच उच्छेद करावा म्हणजे झाले. हे म्हणणे ठीक नाही. त्यांत विसंगति आहे, कारण विकल्पाची उपपत्ति येथे होत नाही. म्हणजे आत्म्याचे स्वरूपाविषयी किंवा त्यांच्या लक्षणाविषयीं जी कांहीं अनेक मते आहेत त्या सर्वांशी विरोध न होतां, आत्मोच्छेद करणे शक्य नाही. उदाहरण घेऊन हे स्पष्ट करता येईल. नैयायिक विचारतात. आत्मा म्हणजे काय! ( १ ) आत्मा हा ज्ञानसंतान आहे काय! म्हणजे आत्मा हा नानाविध ज्ञानांची एक लांब सांखळीच आहे कां! २ किंवा आत्मा ह्याहून व्यतिरिक्त आहे ? प्रश्न करणाराच्या मतांप्रमाणे आत्मा ज्ञानसंतान असला तर नैयायिकांच्या आणि त्याच्या मतांत विरोधच रहात नाही. कारण नैयायिकांच्या मतें. ज्ञान नश्वर असते, तें एका क्षणांत उत्पन्न होते, दुसऱ्या क्षणांत कायम असते, आणि तिसऱ्या क्षणी नष्ट होते. असल्या ज्ञानापासून प्रवृत्ति होते. आणि प्रवृत्तीपासून जन्मदुःखें उद्भवतात, म्हणून प्रवृत्तीचा नाश करणे, हे इष्टच आहे. प्रश्न करणाराचे मत आत्मा ज्ञानाच्याहून भिन्न आहे, असे