पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न्यायदर्शन मिथ्याज्ञानामुळे ( अनात्मनि आत्मबुद्धिः) अनुकूळ वस्त आवडू लागतात, प्रतिकूळ वस्तूविषयी द्वेष उत्पन्न होतो. यामुळे कामक्रोधादि दोष उत्पन्न होतात. या दोषांपासून चांगली वाईट कर्मे करण्यास प्रवृत्ति होते. अशा बऱ्या वाईट कर्मामुळे जन्म प्राप्त होतात. जन्मामुळे शरीर प्राप्त होऊन त्यास दुःख सोसावे लागते. याप्रमाणे संसाराचा हा रहाट नेहमी फिरत असतो. गुरूपदेशामुळे अज्ञानापासून निवृत्त होण्याची इच्छा एकाद्याचे मनांत उत्पन्न झाली असतां, तत्त्वज्ञान हे निवृत्ति होण्यास उपाय आहे. दुःखाच्या अत्यन्त उच्छेदानंतर किंवा निवृत्ति पूर्ण प्राप्त झाल्यावर मोक्ष प्राप्त होतो. दुःखाचा अत्यन्त उच्छेद केल्यावर मोक्ष मिळतो असें आपण म्हणतां. दुःखाचा उच्छेद करण्यास सांगणे म्हणजे कोपराला गूळ चिकटवून तो जिभेने चाटून खा. (कफोणिगुडायितम् ) असे सांगण्यसारखेच आहे. कारण हे जसे अशक्य आहे, तसेंच दुःखाचा सर्वस्वी नाश करणे अशक्य आहे. असे असून ही गोष्ट जशी कांही सिद्धच आहे असें धरून ती करण्यास कसे सांगतां ? अशी शंका काही लोक घेतात. यावर नैयायिकांचे असे उत्तर आहे की, मोक्षवादी लोकांच्या मताप्रमाणे मोक्षावस्थेमध्ये दुःखाची सर्वस्वी निवृत्ति असते. आणि हाच अर्थ सर्व तन्त्रांचा ( तत्त्वशास्त्रांचा ) सिद्धान्त असल्यामुळे दुःखोच्छेद होतो व तो मोक्षप्राप्तीचा राजमार्ग आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. कर्म कर