पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. ह्या शास्त्राचा पराथानुमान हा विशेष आहे. परार्था नुमान हेहि नांव या शास्त्राला देता येईल. ह्या विशेषामुळे हे शास्त्र सर्व विद्या शिकण्यास मार्गदर्शक आहे, आणि सर्व कमांच्या अनुष्ठानास साधनभूतच असते. म्हणजे कोणत्याहि कामांस सयुक्तिक व न्याय्य असा मार्ग किंवा पद्धति कोणती? हे हे शास्त्र सांगते. म्हणून गौतमदर्शनास न्यायशास्त्र म्हणतात, हे नांव यथार्थ आहे. ह्या आन्वीक्षिकी विद्येविषयी असे म्हटले आहेः-- प्रदीपः सर्वविद्यानामपायः सर्वकर्मणाम् । आश्रयः सर्वधर्माणां विद्यादेशे परीक्षिता ॥ (Logic is the science of sciences bart of arts.) प्रमाण, प्रमेय, इत्यादि सोळा पदार्थाच्या तत्त्वज्ञानापासून निश्रेयस ( मोक्ष ) प्राप्त होतो असें पहिल्या सूत्रांतच गौतम मुनींनी सांगितले आहे. यांवर कोणी असा प्रश्न विचारतात की तत्त्वज्ञान झाल्याबरोबरच कां मोक्ष प्राप्त होतो? तत्त्वज्ञान झाल्याबरोबरच मोक्ष मिळत नाही. कारण दुःख; जन्म प्रवृत्ति, दोष आणि मिथ्याज्ञान यांचा नाश तत्त्वज्ञानाने पहिल्यांदा झाला पाहिजे, एकेकांचा नाश होऊन शेवटी ह्या सर्वांचा नाश झाला म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. (दुःखजन्मप्रवृत्तिदोषमिथ्य ज्ञानानामुत्तरोत्तरोतरापाये तदन्तरापायादपवर्गः अध्याय १, सूत्र २) देहादिवस्तू ज्या वस्तुतः आत्मा नसून, त्याच आत्मा आहेत अशी मनाची समजूत असणे, ह्याला मिथ्याज्ञान म्हणतात,