पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भ्यायदर्शन. विवाद्धि, आणि ( ६ ) तत्त्वज्ञानपरिपालन. याप्रमाणे ह्या सहा प्रकरणांचे विवेचन ४८ सूत्रांत केले आहे. पांचव्या अध्यायाचे पहिल्या आन्हिकांत एकंदर अठरा प्रकरणांचा विचार केला आहे. जातिषटकाचे निरूपण हे एक प्रकरण आणि प्राप्तिसम अप्राप्तिसम इत्यादि दुसरी सतरा प्रकरणे आहेत. सूत्रसंख्या ४३. दुस-या आन्हिकांत न्यायाश्रित असे पांच निग्रह, (२) अभिमत अर्थाचे प्रतिपादन न करणारे असे चार निग्रह, (३) स्वसिद्धान्ताला अनुरूप प्रयोगाभासाचे तीन निग्रह आणि ४ निग्रहस्थानविशेष, अशा चार प्रकरणांचा विचार येथे केला आहे. या आन्हिकांत २४ सूत्रं आहेत. येथपर्यंत न्यायसूत्रांची केवल अनुक्रमणिकाच सांगितली. प्रत्येक विषयांचे प्रतिपादन करून त्याविषयी थोडीबहुत माहिती देणे येथे शक्य नाही. तथापि दोन चार मुख्य गोष्टींविषयी न्यायशास्त्राची काय काय मते आहेत, ह्याचे दिग्दर्शन येथे करतो. ___ ह्या दर्शनाला 'न्याय' हे नांव का ह्मणून दिले असे कोणी विचारतील! गौतमानी आपल्या सूत्रांत प्रमाण प्रमेय इत्यादि सोळा मुख्य पदार्थांचे प्रतिपादन केले आहे. तरी ह्या शास्त्राला न्यायशास्त्र म्हणण्याची काही अवश्यकता दिसत नाही. यावर असें उत्तर आहे की, सामान्यतः कोणत्याहि वस्तूला त्या वस्तूंतील विशेष धर्मावरून नांव दिले जाते.