पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. तिसऱ्या अध्यायाचे पहिल्या आन्हिकांत आत्मा, शरीर, इंद्रिये आणि अर्थ ( इंद्रियांचे विषय ), यांचे परीक्षण केलें आहे. इंद्रियभेद, देहभेद, चक्षुरद्वैत; मनोभेद, अनादिनिधन, शरीरपरीक्षा, इन्द्रियपरीक्षा, इन्द्रियनानात्व, आणि अर्थपरीक्षा ह्या नऊ विषयांचे या भागांत प्रतिपादन केलें आहे. सूत्रं ७२. दुसऱ्या भागांत बुद्धि व मन, यांचे परीक्षण केलें आहे. बुद्धिनित्यता, क्षणभंग, बुध्यात्मगुणत्व, बुद्धेः उत्पनापवर्गित्व, बुद्धिशरीरगुणभेद, मनःपरीक्षा, आणि शरीराची अदृष्टापासून निष्पत्ति. असे सात विषय ह्या पदांत आले आहेत. सूत्रे ७९. चवथ्या अध्यायांतील पहिल्या आन्हिकांत १४ प्रकरणांचा विचार केला आहे. १ प्रवृत्ति व दोष यांची सामान्य लक्षणे सांगितली आहेत, २ दोषांची परीक्षा, ३ प्रेत्यभावाची परीक्षा, ४ शून्यतोपादन व निराकरण, ५ ईश्वर उपादानकारण, ६ आकस्मिकत्व, ७ सर्व अनित्य आहे या मताचे निराकरण, ८ सर्वनित्यत्वाचे निराकरण, ९ सर्व पृथक् आहे याचे निराकरण, १० सर्व शून्य आहे या मताचें निराकरण, ११ संख्यैकान्तवादाचे निराकरण, १२ फलपरीक्षा, १३ दुखःपरीक्षा, आणि १४ अपवर्गपरीक्षा. याप्रमाणे चवदा विषयांचे ह्या आन्हिकांत वर्णन आहे. सूत्रे ६८. दुसऱ्या आन्हिकांत सहा प्रकरणे आहेत. (१) तत्वज्ञानोत्पत्तिप्रकरण, (२) अवयविप्रकरण, (३) निरवयवप्रकरण, ( ४ ) बाह्यार्थभंगनिराकरण, (५) तत्त्वज्ञान - --