पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ . प्रसन्नराघवनाटक चंद्रमुखी स्त्री अशी तिघे मला उतरून माझ्या दक्षिण ती. राने जाऊ लागली. गं0- पुढे काय झाले. य- तदनंतर, त्या तिघांपैकी जी स्त्री ती क्षणभर उभी राहून हात जोडून मला नमस्कार करून तिने माझी प्रार्थ. ना केली, की हे देवि यमुने, मी पुन्हा आपल्या कुटुंबा. च्या माणसाला पाहीन, असा माझ्यावर तुझा प्रसाद अ. सावा. गं०- बरे, तुला कसे वाटते १ य.- (गंगेच्या कानांत सांगते की, )असे वाटते. गं०- छेछे, असे कधी घडणार नाही. तुझ्या मनाला का. ही तरी श्रम झाला आहे, ह्मणून तुला भलतेच वाटते. ( विचार करून ह्मणते. ) किंवा प्रारब्धाची गति कोणाला समजते १ JTE य- जर हा वृत्तांत झाला असता, तर तुला समजल्यावांचून रहाताना. तेव्हां तूं ह्मणतेस तसेंच असेल. गं0- हे मला कांहींच ठाऊक नाही. ब्रह्मलोकाहून सर. स्वती आली, तिच्या समागमसुखांतच माझें मन निमग्न झाले होते; तर चल सरयूनदी जवळच आहे; तिच्या मुखानेच हे सर्व वर्तमान ऐकू (असे बोलून दोघीही निघण्यासाठी तयार होतात. इतक्यांत सरयूनदी पडद्याच्या बाहेर प्र. वेश करून ह्मणते.) हे देवीनों, तुझाला मी नमस्कार करते. गं०य- हे सरयू, तुझें कल्याण असो. गं0- (सरयूचा हात धरून ह्मणते.) सखे सरयू, तुझें अंग संतप्त कां झालें आहे ९ स- हे भगवतो, तूं असें उलटं काय विचारतेस. ९ मी तर