पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक mora TV (तदनंतर गंगा आणि यमुना पडद्याच्या बाहेर प्रवेश करतात.) गं0- सखे यमुने, तूं खिन्न कां झाली आहेस ? य.- हे भगवति भागीरथि, खिन्न होण्याचे कारण आहे. गं०- ते कोणते १ य०- एक पहिले असे, की माझा बंधु सुग्रीव ह्मणून आहे. गं0- ( कौतुकयुक्त होऊन मनांत ह्मणते. ) वानरकुळांत उत्पन्न झालेला सुग्रीव हिचा बंधु कसा ९ (मग विचार करून ह्मणते. ) हे योग्यच आहे; कारण ह्या दोघांचाही पिता सूर्यच आहे. ( मग उघड बोलते. ) बरें, त्या मुग्रीवाचें काय झाले? य० - बलाढ्य आणि दुष्ट जो इंद्राचा पुत्र वाळी त्याने त्याला मारून घरांतून घालवून दिले, ह्मणून तो आतां कां. ही वानर घेऊन एक्या डोंगरावर राहात असतो. गं०- बरें, हे दोघेही बंधु असून त्यांचे वैर कसे पडले १ किंवा, श्लोक दोघांचा एक वस्तूच्या ठायीं जो अभिलाष तो॥ होतोच वैरवृक्षाचा बीज हे जन सांगतो ॥ १॥ बरें, हे अमूंदे, दुसरे काय कारण ते सांग बरें. य.- कोणी एकेदिवशी तपस्व्याचा वेष धारण करणारे व मूर्तिमान मदनच काय, असे दोन तरुण पुरुष आणि एक