पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक १ श्लोक प्रत्येक अंक रससंगत आणि शुद्ध नव्य' प्रफुल्ल मुमराजि समान बंध ।। धर्मेतरांशुपरि वक्र असून कांत नाट्यप्रबंध अतिमंजुल अर्थ जांत ॥८॥ सू- ह्या श्लोकावरून कोणते नाटक हे कसे समजेल । (विचार करून हंसून ह्मणतो) अरे, जसे हातांतले कंकण आरशांत पहावे, तसे मी करीत आहे. हाच श्लोक सात सात अक्षरांची एक एक ओळ अशा आठ ओळींत लिहिला असतां जी ओळींच्या. आरंभी अक्षरें ये. सात ता जळन वाचली असतां प्रसन्नराघवनाम नाटक स्पष्ट होतें. न०- (तोच श्लोक ह्मणून आनंदाने ) अहो, वाणिदेवीचा काय महिमा आहे बघा, की जिच्या असादाने अशा त-हेच्या विचित्रविचित्र आणि गोड उक्तो कवींच्या मुखांतून निघतात. सू°- हेच खरें. अरे, ह्या कवीनेच झटले आहे. श्लोक. हे वाणि देवि पदरेणु तुझा उडाला ॥ तो साधुचित्तधरणीत गडोन गेला ॥ त्याचीच वेल कविता फलयुक्त झाली ।। जेव्हां तुझ्या श्रवणपुष्पपदास आली ॥ ९ ॥ (पुन्हा विचार करून) माझें मन तर कवींमध्ये आद्य १ (नव्य ) नुतन. २( सु मराजि ) पुष्पपंक्ति३ चंद. ४ ( पद) पदवी.