पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ प्रसन्नराघवनाटक कवी जो वाल्मिकि ऋषी ह्याकडे ओढ घेते, कांकी ज्या ची कवीता ब्रह्मदेवही स्वतः गातो. न०- ब्रह्मदेव काय सर्व त्रैलोक्य गाते असें झटल्यास चिंतानाहीं. श्लोक. श्रीरामकीर्तिरमणी रमणीयभावें ॥ हिंडावया त्रिभुवनांत अतांच जावें ॥ हे ती मनांत अणतां मुनिवाल्मिकी हा॥ भेरीमु' घोष घडला पहिलाच पाहा।। १०॥ ज्याचा मुखेंदुरस काव्यसमुद्र झाला ॥ हे अल्प थोर कविमेघ पितात त्याला ।। तेणेकरून मग ते करतात वृष्टी॥ ती हीच, जी घडतसे नव काव्य सृष्टी ।।११।। माझा चित्तचकोरपक्षी तर रामचंद्राचेच ठिकाणी फार आनंद पावतो, कांकी ज्याच्या कीर्तिचंद्रिकेच्या स्पर्शाने वाल्मिाकि ऋषीच्या कवितासमुद्राला भर्ती आली. सू०- असेंच आहे. श्लोक. चंद्री तसें रामचंद्रीं कांतांच्याहि दृगंचलीं।। तो न मन कोणाचें नीलोत्पलमुत्दृत्प्रभी ।। १२॥ गकून ऊर्ध्व अजलोक निघून आली ॥ ह्या भूतळीं श्रमित फारच देवि झाली ।। ती राम कीर्ति सुरसांत बुडोन गेली ॥ तेव्हांच दूरगमनश्रममुक्त झाली ॥१३॥ न- सर्व कवी रामचंद्राचेच वर्णन कां बरे करतात १. सू- हा कवींचा दोष नव्हे. १ नगान्याचा नाद, २ नूतन, ३ ब्रह्मलोक.