पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक प्रसन्नराघवनाटक न०- ( हंसून ) नांवावरून गुण समजतात काय ? सू०- ह्यांत काय संशय ९ श्लोक नांवावरून जाणावे थोरांचे गुण सुंदर।। जसे सुवर्ण श्रीखंड रत्नाकर सुधाकर ॥ ६ ॥ बरें, सांगतों, ऐक. त्या गुणारामाने, रतिजनकनामक राजाच्या सभेत हरचापारोपण नांवाचे नाटक दाखवन राजा संतुष्ट केला, मग त्या राजापासून रंगविद्याधरख्यातिरूपस्त्री मिळविली, आणखी गुण काय सांगू ? न०- तो तुझा भाऊ आतां कोणत्या देशांत आहे ? मू.- कोणी एक दक्षिण देशांतला धूर्त बहुरूपी आला, आणि आपलेच नांव गुणाराम असे सांगून रंगविद्याधरख्याति चे हरण करून गेला. तें वर्तमान समजल्यावर गुणाराम ती परत आणण्याकरितां त्या दिशेस आतां गेला आहे. असें ऐकिलें, की त्याने सुंकठनामक गायकाबरोबर स्नेह करून दक्षिणेकडील राजांच्या सभेत नाटकयुद्धाचा उ. पक्रम केला आहे. न.- तर हा मोठाच उपक्रम दिसतो. सू- हे नीटच आहे पहा! श्लोक गाती जसें कमळदंडभुजा कवींद्र तैसें जिचे वदनही परिपूर्ण चंद्र ॥ हैं चांदिणेच हसणे कमळेच डोळे 'कीर्ति प्रिये'सम कशी हृदयीं न लोळे ॥ ७॥ बरें, तूं काय सांगतोस ते सांग १ १ (प्रिया ) आवडती स्त्री. टाप. प्रथम तीन चरणांतील विशेषणे किर्तीची व प्रियेची आहेत. L LIBRARY লালসালু বা