पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटका अंक श्लोक म्या हे क्षत्रियपुत्रकंठ चिरतां वाहूं च जी लागली रक्ताची तटिनी तिच्या च मग मी स्नानास गेलों तली ।। केले केस च दर्भ मत्पितगणा रक्तांजली अर्पितां तोषे निंदितसे कृपायुत दिसे त्रासे हंसे तो स्वतां ॥४२॥ आतां तें कशाला पाहिजे. प्रलोक पूर्वी त्रिः सप्तवार प्रथित नप रणी मारले मी अपार मारावे त्याप्रमाणे नरपति अवघे मत्त झाले च फार ॥ त्यांच्या त्या मस्तकांची सुघटित अशी काय रुद्राक्षमाला आतां माला करून प्रणति सह पहा अर्पितो भैरवाला ॥४३॥ रा. श्लोक कोपातें त्यज हो प्रसन्न त्दृदयीं ही ठेव मदैखरी आयासें बहुवेळ जी मिळविली कीर्ति प्रतिष्ठा बरी ॥ ती कां आज गमावितोस सुचली ही बुद्धि कां घातकी ज्याचा त्यास बरें कसा न दिसतो होणार जो घाव की॥४४॥ १०- कशी रे गमावीन १ ( विचार करून ह्मणतो, ) किंवा. श्लोक तुह्मी वाचाळ रे फार तुह्माशी बोलणे पुरे ॥ हिंस्र बाणां तुमी माझ्या करा सहन सर्व रे ॥४५॥ रा- सर्व कशाला पाहिजेत ज्याने हरचापारोपण केलें व जो जानकीने अर्पण केलेल्या कमलपुष्पांच्या माळेचे स्वत्वद. यी धारण करतो आहे, तो मी एकटाच स्वत्दृदये करून सहन करीन. १ नदी. २ एकवीसवेळा.३ प्रख्यात. ४ नमस्कार ५ घातक