पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक प्रसन्नराघवनाटक प०- अरे पातक्या, कुलदूषका जारिणीपुत्रा, कशीरे भार्गव कुळाच्या पुढे आपल्या तपश्चर्यची प्रतिष्ठा दाखवितास १ ला. | ज नाहीरे वाटत तुला. रा०- हे भगवन, भृगुकुल आणि आंगिरसकुल ही दोन्ही सर्व लोकांत प्रख्यात आहेत; आणि आपण शिवशिष्य आहां, तेव्हां आपलें तप अधिक आहे, ह्यासाठी काही वि. नंती करतो. श्लोक हे बाण बाणासन हे कुठार ही वक्रवाणी अकुटीविकार ॥ हे क्षत्रियांचे सगळे प्रकार तुझा मुनीते तर निंद्य फार ॥३८॥ तुह्मीं मना शांत तपें करावें । 'सितोपलांचे मणिहार ल्यावे ।। कुशांस दंडास कमंडलूस। घ्यावे करावा उटजांत वास ॥३९॥ (पुन्हा मोठ्या नम्रतेने ह्मणतो.) आपणच हा विचार करा, की आर्या कोठे अशुभ परश्वध कोठे हैं कुल पवित्र विख्यात ॥ कोठे मोठे धनु हे को स्वस्थ स्वभाव हा शांत ॥४०॥ कोठे मोठ्या समरी सुटणारी ही कराल इषुमाला॥ कोठे कुशनवपल्लव पुष्पं अथवा तशी छ दनशाला ॥४१॥ प.- कसा, दुसऱ्याप्रमाणे मला ही केवळ मुनि असेंच मा मतोस ९ पण मी जमदाग्निचा पुत्र आहे बरें. . स्फटिकांचे. २ पर्ण कुटीकेत ३ मयंकर. ४ बाणपंक्ति.५ पर्णशाल