Jump to content

पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक स्वाभाविक कठोर भाषण करणारा आहे, म णून त्याला मा. त्र माझा कुठार कापील. (पडद्यांत शब्द होतो.) अरे, जमदग्निपुत्रा, तूं फार डौल करतोस, तर तुझ्या शासनासाठी हे पहा धनुष्य घेतों. प.- ( हंसून ह्मणतो. ) हा जनकराजा कशाला आला. ( मग उच्च स्वराने बोलतो.) अरे याज्ञवल्क्याशिष्या, तुला धनुष्य कशाला पाहिजे ? तूं पद्मासनाचाच आश्रय कर. (पुन्हा हास्यपूर्वक निंदायुक्त कांहीं बोलतो.) श्लोक घाला स्वकंठी कमलाक्षमाला ॥ ही युद्धवांछा धरतां कशाला ॥ आहां तुह्मी भोत्रिय भूप सारे ॥ ते अन्य जे जिकिति खड्गमारें ॥३०॥ तर मला तुझ्याशी काय कर्तव्य आहे. १ पण अगोदर ह्या क्ष. त्रियांच्या दोन ठिणग्या आहेत ह्या विझवितों. (पुन्हा पडद्यांत शब्द होतो. ) अरे जमदग्निपुत्रा, जमद. गि ऋषी शांत स्वभावाचा असतां तूं त्याचा पुत्र असूनही शांतिरहित कसा झालास ? प.- ( मनांत ह्मणतो.) हा तर शतानंद बोलतो आहे. ( मग उघड ह्मणतो.) अरे शतानंदा, हे शांतिनामक धन कोण. ल्या पित्यापासून तुला मिळाले गौतमापासून किंवा इंद्रा. पासून १ ( पुन्हा पडद्यांत शब्द होतो.) हा पाण्या निजजननीचा कंठ छेद करणाऱ्या कुलांगारा, अरे आमच्या आंगिरस कु. ळाची केवढी तपश्चर्या ? असे असून ही त्या कुळाला कलं. क लावतोस.