पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७९ अंक ४ प्रसन्नराघवनाटक प०- (आश्चर्य वाटून मनांत ह्मणतो. ) वा! काय ह्या क्षत्रि याच्या पोराचे भाषणचातुर्य आहे हो! असो, ( मग उघड बोलतो. ) लक्ष्मणाच्या भाषणाची मी क्षमा करतो; परंतु हा कठोरप्रकृति माझा कुठार क्षमा करीत नाही, ह्या कु. ठाराचा स्वभाव तुला ठाऊक नाही काय? श्लोक. मारून सर्व अवनीपति भूमि ज्याने केली अराजक मदीय परश्वधानें ।। रक्तास्छि केश पसरून चहूंकडेरे केली 'त्रिवर्ण पृथिवी उभयप्रकारें ॥३४॥ ( पुन्हा क्रोधाने ह्मणतो. ) कसा ह्या परशूचा स्वभाव तुला माहीत नाही? आर्या ज्याच्या धारापाते तुटले युद्धी नेपालबालगल ॥ नीरेणुका च धरणी तद्रक्तं शोभलीच ही सकल ॥३५।। त्या बाळांतें वरण्यास्तव जी जी स्वर्गकन्यका आली। तत्कर पुष्करमाळारेणूंनी भू सरेणुका झाली ॥३६॥ ल०- हे भगवन हे मात्र खरें, की तुझ्या कुठारधारेच्या प. राक्रमाने ही भूमि 'नीरेणुका झाली. १०- ( मनांत ह्मणतो. ) अरे, हा कसा भाषणांत रेणुकेचा वृत्तांत काढून मला लावून बोलतो. असो, (मग उघड बो लतो. ) अरे क्षत्रियाच्या पोरा, तू निरापराध आहेस तर तुझ्यावर मी कुठाराचा प्रहार करीत नाही; परंतु तुझा कंठ १ ( वर्ण ) जाति आणि रंग २ धूलि रहित ३ ( पुष्कर ) कमळ, ४ रेणुका रहित