पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ४ विप्रांचे उपवीत हे नवगुण प्रख्यात आहे बळ ॥३०॥ रा०- वत्सा, हा मुनि आपणास पूज्य आहे, तेव्हां त्यापुढे हे दांडगेपणाचें भाषण पुरे. प.- त्यांत त्याचा काय दोष आहे १ मीच मुळी चुकलो. आर्या तुमचा पूर्वज बसला नग्नस्त्रीमंडळांत त्या काळी ॥ माझ्या दुष्ट कुठारे त्याची केली न त्यामुळे होळी ।।३१॥ तत्फल की तन्कु'लज क्षत्रांची ही कठोर दांची ।। वचनें श्रवणी माझ्या शिरतात कृपा न योग्य सचिी ।।३२॥ रा०- हे भगवन्, हा बालक अजून दुग्धकंठ आहे, तर त्या वर इतका कोप न करावा तर क्षमाच करावी. प०- अरे, काय ह्मणालास हा दुग्धकंठ आहे ९ हा दुग्धकंठ नाहीं, खचीत हा विषकंठच आहे. ल- हे भगवन, आपण नीलकंठाचे शिष्य आहां, तेव्हां क्ष_मा करणे हे अवश्यच आहे. प०- ( क्रोधाने ह्मणतो.) अरे विषकंठ एवढ्या नावानंच तूं ही माझा गुरु काय ल.- हे भगवन, मी ह्या अर्थाने बोललों नाही; तर दुसरा अर्थ मनांत आणून बोललों, तो असा की, श्लोक किरीटारूढ झाला च बालचंद्र जरी तरी ॥ विषकंठ मनी काय क्रोध आश्रय तो करी ॥३३॥ तेव्हां आपण त्याचेच शिष्य आहां, ह्मणून अवश्य माझी क्षमा करण्यास योग्य आहां. १ त्याच्या कुलापासून झालेले