Jump to content

पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ४ पणा केला, आणि आमी ही तो बोलून दाखविला; परंतु ह्याच्या लक्षात येत नाही. अरे, क्रोध येण्याचे कारण काय ते अजून तरी ऐक. त्रिपुरासुरपत्नीते वियोगव्रत बोधिलें । ज्याणे त्या शंकराचें त्वां किमर्थ धनु मोडिलें ॥२४॥ रा०- ही खोटी लोकवार्ता ऐकून निरपराधी जो मी त्यावर आपण व्यर्थ रागावला आहां. १०- तर मग शिवधनुष्य स्वस्छ आहे काय ? रा- छे, छे. १०- तर अपराधी नाहीस काय ? रा- मी काय करूं । श्लोक मी हस्तस्पर्श केला की नाहीं तो हरकार्मुक ॥ गेले मोडून तत्काळ ते आपण च धार्मिक ॥२५॥ पं०-वा, कसा बाणाच्या अग्राला चंदन लावून, तो बाण माझ्या हृदयावर ठेवून माझें त्दृदय थंड करतोस, तर आता हे बोलणे पुरे. (मग परशू हातांत घेऊन ह्मणतो.) श्लोक हे राम शैव धनु भग्न करून पापी झालास यास्तव कठोर कुठार कापी ।। कंठा तुझ्या प्रथम निर्दय हा असारे पाहोत कृत्य जनकादिक भूप सारे ॥२६॥