पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ प्रसन्नराघवनाटक पश्लिोक जो न म फार सुकुमार कुमार राम चंद्रासमान दिसतो नयनाभिराम ॥ अत्यंत कोप असल्यावर योग्य काय ( पुन्हा क्रोधाने ह्मणतो.) मोडी गिरीशधनु यास घडो अपाय ॥२१॥ ( पुन्हा दया येऊन ह्मणतो.) - आर्या जनकसुता ही विधवा अस्त्रं माझ्या न योग्य होण्यास ॥ (पुन्हा विचार करून क्रोधाने ह्मणतो.) हा रेणूकागळ्यातें भ्याला नाही कुठार चिरण्यास ॥२२॥ (मग मोठ्याने ह्मणतो.) हे दशरथपुत्रा, हा माझा भाष णाचा प्रकार लौकिकरीतीप्रमाणे बाह्यान्कारी मात्र आहे. रा०- (हंसून ह्मणतो.) बरें मनांत काय आहे ? प.- श्रवण कर. श्लोक हैं भंगिले शिवधनुष्य ह्मणून जाते अत्यंत गर्व चढला च तुझ्या भुजांतें ।। छेदून त्यांस रुधिरें कठिणा कुठारा पाजीन मी मधुसमान धरून धारा ॥२३॥ रा०- हे भगवन, मी आपल्या स्वाधीनच आहे. जे आपण कराल ते करा; परंतु क्रोध येण्याचे कारण काय ते मला समजले पाहिजे. प.- काय गर्वाची धुंदी चढली आहे! पहा, आपणच दांडगे