________________
प्रसन्नराघवनाटक अंक हे ज्येष्ठ बंधो, रामचंद्रा, हे पुढे ब्राह्मणक्षत्रियरूप चित्र सारखे दिसते ते काय ? रा०- वत्सा लक्ष्मणा, तुला ठाऊक नाहीं काय ? हा भर वान जमदग्निपुत्र परशुराम आहे. आर्या भेदी क्रौंच गिरीते देई भूमंडळास बाणानें ॥ हटवून सागरातें वसवी कोंकण नवें स्वशक्तीनें ॥१८॥ युद्धात षण्मुखातें जिकी अर्जुनभुजातरुवनाते । छेदी कुठार ज्याचा तो हा ज्या क्षत्रकाल जग ह्मणते।। १९॥ ल.- तर ह्याचा स्वभाव मोठा आश्चर्यकारक दिसतो. रा०- आश्चर्यकारकांचा मुगुटमणि असें ह्मण. हा तर, श्कोल धेनुच्यापरि कश्यपास धरणी देई महा आदरें स्त्रीवेषे वसती कितीक नपती गेहांत ज्याच्या'दरे ।। क्रौंचाद्रीस विदीर्ण षण्मुख करी शक्तिप्रहारे पहा त्याने विद्ध करून बाणनिचयें संतुष्ट झाला न हा ॥२० (असें बोलून रामलक्ष्मण दोघे इकडे तिकडे फिरतात. ) रा- ( हात जोडून ह्मणतो. ) हे भृगुकुलश्रेष्ठा परशुराम आह्मी तुला नमस्कार करतो. प.- समरंगणी तुझा जय असो. रा०- हे भूगुकुलचूडामणे मी आपल्या आशीर्वादाने कृतकृत झालों. प.- (मनांत दया येऊन ह्मणतो.) १ मयें.