पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ प्रसन्नराघवनाटक अंक ४ होणार आहे, तेव्हां स्वस्तिवाचन करण्यासाठी ब्राह्मणांस बोलावा. प.- (तांड्यायनाकडे फिरून क्रोधाने ह्मणतो.) अरे ब्राह्म. णाधमा, तूं रावणाने धनुष्य मोडले असे सांगून मला फ. शिवलेंस; कांकी जनकाचा जामात तर हा दुसराच को. णी दिसतो आहे. तां०- हे भगवन ह्यांत माझा अपराध काय ? मी अर्धे बोल. तो आहे, तोच तूं भलतेच समजून प्रांतीत पडलास. प.- तर आतां सगळे सांग, तां०- श्रवण कर. म. आर्या मारीचादिक राक्षस जे कौशिक यज्ञघातकर झाले ॥ वश ज्याच्या बाणाच्या आणि पराभव दशेस ही गेले॥१३॥ (त्याच्याच प्रचंड बाहुदंडांनी ओढितां धनु मोडलें इत्यादिक श्लोक पुन्हा ह्मणून दाखवितो.) प.- बरें, मारीचाचा पराभव करणारा असा हा कोण ? तां०- श्रवण कर. श्लोक जे ऋष्यशृंगचरुभागबळे कुमार झालेच 'पंक्तिरथराजवधूंस चार ।। हा त्यांतला प्रथम सुंदर रामनाम जो कौशिकाख्य मुनि शिष्य उदारधामा ॥ १४ ॥ प.- (क्षणभर विचार करून क्रोधाने ह्मणतो.) श्लोक दुर्धर्ष सिद्ध नरकिन्नर देवताते ।। तो पावला त्रिपुर भस्मदशेस जेथें ।। १(पंक्तिरथ दशरथ