पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ४ (पाहून ह्मणतो. ) हा शतानंदाचा शिष्य, तांड्यायन हिकडे कां येत आहे ९ (इतक्यांत तांड्यायन पडद्याच्या बाहेर येऊन परशुरामाला ह्मणतो.) हे भगवन, मी नमस्का र करतों. प०- आयुष्मान हो. तुला मी काही विचारतों ते सांग. अ. जून तुझ्या गुरूच्या यजमानाची हरचापारोपणाची इच्छा नाहींशी झाली की नाही ? तां०- नाहीशी झाली. प०- (आनंदाने ह्मणतो. ) एकूण नाहींशी झाली. तां०- धनुष्यासुद्धा नाहीशी झाली. प.- ( घाबरेपणाने ह्मणतो. ) काय ह्मणालास १ धनुष्यामु. द्धां नाहींशी झाली? तां०- होय, असेंच बोललों. प०- बरे, आतां कसें वर्तमान झाले ते स्पष्ट सांग. तां०- कोणा एकाच्या. श्लोक प्रचंड बाहुदंडांनी ओढितां धन मोडलें ॥ शिवाचें 'भृगुमार्तडा तच्छब्दें विश्व कोंदले ॥ ८ ॥ प०- ( रागाने विचारतो.) कोणाच्या बरें १ तां.- श्रवण कर. आर्या मारीचादिक राक्षस जे कौशिकयज्ञनाशकर झाले ॥ वश ज्याच्या. ( इतके बोलतो, तोच परशुराम ह्मणतो.) पुरे आतां, समजलों कोणतो. तो दुष्टशिरोमणी राक्षस राजा. १ परशुरामा