पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ प्रसन्नराघवनाटक आर्या उदित सहस्रार्जुनभुजविपिनी जो दीप्त 'तुंग नृपवंशी ॥ निमिकुलशुष्कतृणाला क्रोधाने तुज करूं कसा स्पर्शी ॥४॥ ( पुन्हा विचार करून ह्मणतो. ) परंतु हा मनःकल्पित जा. मात्याच्या भुजबळाच्या जोरावर गर्वाने दांडगेपणाचें भाष. ण करतो आहे, तेव्हां त्याची उपेक्षा करणे हे नीट नव्हे. बघा, आमच्या परशूला ह्याने किती दांडगेपणाचा निरोप पाठविला आहे. श्लोक तूं माझा बहु मित्र यास्तव मला ही बोधिली वैखरी इत्यादि सर्व जनकाचे भाषण पुनः ह्मणतो. अरे, या जनकाला काय गर्व झाला आहे १ ह्याला माझ्या परशूचा पराक्रम ठाऊक नाही काय? श्लोक ज्याच्या धाराप्रहारें दशशत कर हे छिन्न होतां निघाली रक्ताची धार तेव्हां नव रविकिरणातुल्य शोभाच आली।। 'फुल्लाशोकदु कीहा सुरपुरवनितालोचना भ्रांति देई तो राजा कार्तवीर्य स्वकपुरवनितानेत्रशोकदु होई ॥ ५ ॥ ( आणखी दुसरें ही), आर्या ज्याणे निबद्ध केला लीलेने नर्मदा नदीपूर ॥ 1 आणि रणी रावण ही केला बद्ध प्रसिद्ध जो शूर ॥६॥ आर्या तो कार्तवीर्य त्याचे भुजवन धाराजळी बुडे सकळ ॥ ज्याच्या तो हा माझा धाराजळ टाकतो परशु विमळ ॥७॥ १ उंच २ वेळू २ फुल्लेला अशोकवृक्ष