पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक HOME अंकमा (पडद्यांत कोणी एकानें एक आर्या हाटली. ) आर्या रत्नप्रदीप जळतो जनकनपाच्या सभेत हा विमळ ॥ मोठा ही पवन जरी सुटला होईल ह्या पुढे विफळ ॥ १ ॥ (पुन्हा पडद्यांत शब्द होतो. ) अरे क्षत्रियानों, मागें सरा; आणि नजरेस पडूं नका. कां ह्मणाल तर, श्लोक बालादित्यसमान दृष्टि दिसते आरक्त ज्याची अहो ज्याची तीव्र कुठारधार रुधिरें न्हाली नपांच्या च हो ।। दोरी शब्द करी असें धनु करी ज्याच्या जगत्कांपते श्वासांनी जमदग्निपुत्र पहिला आला पहा रूप तें ॥ २ ॥ (तदनंतर पडद्याच्या बाहेर परशराम येऊन, मोठ्या डौ. लाने इकडे तिकडे फिरून ह्मणतो.) अरे, हा जनकराजा किती दांडगा आहे ! पहा, की ज्याने हरचापारोपणेकरून च कन्यादानाची प्रतिज्ञा केली आहे. (नंतर आपल्या परशूकडे पाहून ह्मणतो.) आर्या नपकंठरुधिरपूर ज्याची गेली धुऊन खर धार ॥ तो हा कुठार माझा जनकन हीन विश्वकरणार ॥३॥ (पुन्हा विचार करून ह्मणतो.)