Jump to content

पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६ प्रसन्नराघवनाटक अंक ३ साऱ्या क्षोणीपतींच्या मदनसम मनी पाहातां रूप ज्याचें आनंदक्रोधखेदाद्भुतगण अवघा एककाळी च नाचें ॥५६॥ ( इतक्यांत पडद्या बाहेर शतानंद येऊन मणतो.) श- हे जनकराजा, तुला चांगले वाटो अथवा वाईट वाटो, मी जसे पाहिले तसे सांगतों. श्लोक ज्यावल्ली करपंकजें रघुवरें आकर्ण आकर्षितां ज्याची भ्रू न चळे गिरीशधन ते मोडे अपाप स्वतां ॥ कंठांतून न गर्वशब्द पडला बाहेर ज्याच्या अहा चापाचा त्रिजगांत ही पसरला मोठा टणत्कार हा ॥५॥ ज- असें अमर्याद कर्म करण्यापासून कुमार रामाचे निवा रण तूं का केले नाही? श०- कसे बरें निवारण करावे ? आर्या राघवहस्तस्पशैं गेलें भंगून 'गिरीशकार्मुक ते ।। तच्छब्दसागरांत ब्रह्मांड बुडून फार डळमळतें ॥ ५० । ज०- तर आतां लौकर जानकीरामचंद्रांच्या पाणिग्रहणा विषयी विश्वामित्र ऋषीचें अनुमत घ्यावे. - आर्या मोडून शैव कार्मुक झाली शकलेच दोन ती जेव्हां ।। सीतारामकरांचा झाला संयोग निश्चये तेव्हां ॥ ५९ तर आतां उर्मिला आणि लक्ष्मण ह्यांच्या पाणिग्रह गणाविषयी विश्वामित्र ऋषीश्वराची प्रार्थना करावी. वि०- ( हंसून ह्मणतो. ) हे तर असो; परंतु १ शिवधनुष्य