________________
अंक ३ प्रसन्नराघवनाटक श्लोक अतिमृदुलकरांनी चाप हा शंकराचा दशरथतनयाने कर्षतां बाण त्याचा ॥ जनकनपसुतेचा सिद्धझाला कटाक्ष असितजलरुहाच्या कांतिचा जो विपक्ष ॥ ५२ ।। ल.- हे भगवन विश्वामित्रा, हे तर फारच अद्भुत झालें आहे. . श्लोक भेदी श्रीविष्णुनिद्रा सकलनुपमहाशौर्यदर्पास मोडी दिग्दतिश्रोत्र फोडी निजबळविभवें कूर्मराजास झोडी ।। श्रीरामस्तोत्रधारी प्रलय धनघटागर्जना तुछकारी झाला टंकार मोठा पशुपतिधनु हे मोडतां तीव्र भारी ॥५३॥ प्र०- ( भालदाराला ह्मणते. ) श्लोक जे डोंगरांच्या निजले गुहांत त्यांत करी जागृत जो क्षणांत ।। जो भंगतां भर्गधनुष्य झाला तो हा टणत्कार करी भयाला ॥ ५४ ॥ आर्या सिंह भयाने ज्याच्या ओरडले गिरिगुहांत सडकून ॥ तच्छब्दयोग होतां फोडी ब्रह्मांड ऊर्ध्व धडकून ॥ ५५ ।। भा०- प्रतीहारीला झणतो, चमत्कार पाहा. UAE श्लोक मोडी 'चंडीशचापा निजत्दृदयतटीं जानकीदत्तमाला घाली श्रृंगार वीर प्रथितरस पाहा शोभती एक वेळा ।। १ ( आसित ) नील २ शत्रु ३ मेघसमुदाय. ४ शिवधनुष्य, ५ शिवधनुष्याला. ६ ( प्रथित ) प्रख्यात