Jump to content

पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक प्रसन्नराघवनाटक ज- भटजी, काय निरोप आहे ? - ब्रा- राजा ऐक. TET श्लोक ज्याच्या कीर्तिभयाट्टहासविभवें त्रैलोक्य गोरे असा जो क्षत्रांतक जामदग्न्यपरशु क्रोधेंदिसे रुद्रसा ॥ शंभूचा निजभृत्य वैरिवनिता नेत्रांतलें जो पितो तेजें कज्जल कालकूटविष तो आज्ञा तुला सांगतो ॥ ४५ ज०- ( मनांत ह्मणतो. ) काय चमत्कार ! हें गर्वांचे भाष किती वांकडे आहे! ( असो मग उघड बोलतो.) भटज जामदग्न्यपरशूची आज्ञा तरी काय आहे ९ ब्रा- सांगतों ऐक. श्लोक वाटेल त्या नृपसुताप्रत आत्मकन्या दे पाव आयु चिरकाल नेपाल धन्या ।। ह्या शैव कार्मुकविकर्षणपातकातें केलेस तूं तर करीन तुझ्या वधातें ॥ ४६ ॥ ज०- (हंसून ह्मणतो.) भटजी, माझा ही उलट निरोप परशुरामपरशूला सांगा. बा०- काय सांगू ? ज.- असें सांगा. श्लोक. तूं माझा बहु मित्र यास्तव मला ही बोधिली वैखरी आकर्षील धनुष्य त्याप्रतच मी देणार कन्या खरी ।। १ (आदास ) खदखद हसणे २ वाणी.